नेहमीच धकाधकीच्या वेळी रात्री अपरात्री दुकान उघडून मदत करणारा दोन पैसे मिळकतीच्या उद्देशाने आपली गैर सोय टाळत वेळेला मदतीस उभा ढाकणारा. शहरासह संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात असतांना जागतिक महामारीच्या वेळी ऑनलाइन सेवा बंद असताना देखील जनसामान्यासाठी सेवा देत कामकरणारा आपल्या स्थानिक उत्सवांना लागणारी सर्वच यंनत्रणेला लागणाऱ्या वस्तू पुरवनारा आपला स्थानिक दुकानदारच होता. म्हणूनच कुटुंबा समवेत बाहेर पडा बाजारपेठांमध्ये खरेदी करा तुमच्या शहरातील बाजारपेठामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण करा तसेच नागरिकांनी स्थानिक व्यापाऱ्यांकडून छोट्या-मोठ्या दुकानदारांकडून खरेदी करा असे आवाहन गल्ली नं ५ येथील किसनवाला बत्ती खुंट यथे वैठकीत भारतीय जनता पार्टीचे व्यापारी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष नगरसेवक हर्षकुमार रेलन यांच्याकडून करण्यात आले आहे.यावेळी नगरसेवक हर्ष कुमार रेलन, उमेश जैन, हिरामण आप्पा गवळी, तसेच व्यापारी वर्ग उपस्थित होते.