नंदुरबार – काँग्रेसच्या नेत्यांनी तुमची केवळ दिशाभूल केली. भूलथपा देत गेले. दर महिन्याला साडेआठ हजार रुपये खटाखट दिले जातील असे म्हणाले होते. तुम्हाला खटाखट पैसे मिळाले का? त्याच्या उलट मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकार आपल्या शब्दांवर ठाम आहे भूमिकेवर ठाम आहे. मोदी सरकारने सांगितले होते आरक्षण हटवणार नाही सत्ता आल्यानंतर त्यांनी आरक्षणाला धक्का लावलेला नाही आणि याच्यापुढेही लागणार नाही. राज्यातील महायुती सरकार लाडक्या बहिणींना पैसे देत आहे, पिक विमा विज बिल माफी च्या माध्यमातून शेतकऱ्यांना देत आहे त्याच्या व्यतिरिक्त गावागावात पाणी योजना रस्ते वीज दिली जात आहे. म्हणून यापुढे मतदारांनी भुलथापांना बळी पडू नये; असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे तथा महायुतीचे उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केले.
नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे तथा अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना शिंदे गट आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट या मित्र पक्षांच्या महायुतीचे उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी कोळदा गटातील 13 गावांमध्ये झंझावाती दौरा करून मतदारांशी संवाद साधला. त्याप्रसंगी घेतलेल्या कॉर्नर सभांमधून त्यांनी वरील प्रमाणे आवाहन केले.
लोकांच्या अपेक्षांना न्याय देणारा विकास यापुढेही चालू राहील आणि त्या कामाच्या बळावर निश्चितच आमचा विजय होणार आहे भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष जे एन पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश गावित, युवराज पाटील यांच्यासह प्रत्येक गावातील सरपंच सरपंच आणि महायुती मधील मित्र पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या दरम्यान झालेल्या भाषणांमधून त्यांनी सांगितले की, लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न लोकसभा निवडणुकीत झाला. दुर्दैवाने लोकांनी घाबरून त्यावेळेला चुकीचे मतदान केलं पण आता ते सावध झालेत. मी जो काही विकास करतोय त्याच्यावर लोकांचा विश्वास आहे.
जवळजवळ 30 वर्षापासून सातत्याने जनता मला विश्वासाने निवडून देते आहे. या पुढच्या काळामध्ये मतदार फसणार नाही. काँग्रेसच्या भूलथापांना फसायचे नाही, ही भावना लोकांमध्ये निर्माण झालेली आहे.त्यामुळे जे मागच्या काळामध्ये झालं ते होणार नाही आणि दुसरी गोष्ट मला सांगायची आहे की, आम्ही विकासावर मत मागत असल्यामुळे निश्चितपणाने कुठल्याही पक्षाचा कोणीही उमेदवार विरोधात उभा राहिला तरी विजय आमचाच होईल.
आमच्या मित्र पक्षातील काही लोक विरोधात गेले. त्या विरोधकांना त्यांच्या चुकीची मोठी किंमत मोजावी लागली जर त्यांनी पुन्हा तसे केले तर त्यांचा पुढील काळ कठीण राहू शकतो, असे डॉक्टर विजयकुमार गावित म्हणाले. दरम्यान, विविध योजनांच्या माध्यमातून गाव विकासासाठी आणि वैयक्तिक लाभासाठी केलेल्या कामांचा उल्लेख देखील त्यांनी भाषणातून केला.