नंदुरबार : अक्कलकुवा अक्रानी मतदारसंघात महायुतीचा घटक पक्ष शिवसेना शिंदे गटाला सोडण्यात आली या विधानसभेच्या जागासंदर्भात महायुतीतील शिवसेना व भाजपा यांच्यात टिकीटाबाबत रस्सीखेच झाल्याचे चित्र होते. दहा वर्ष मी खासदार म्हणून या नंदुरबार मतदारसंघात काम केले आहे प्रत्येक गाव – पाड्यांमध्ये विकासाचे योजना पोहचवले आहेत म्हणून मला विश्वास आहे की अक्कलकुवा अक्रानी विधानसभा मतदारसंघाची जागा भाजपाला सुटावी यासाठी पक्षश्रेष्ठीकडे मागणी केली होती मात्र अखेर शिवसेनेच्या पदरी जागा पडल्यामुळे मागणीला पुर्णविराम मिळाला.
जिल्हात महायुतीत घटक पक्षात बिघाडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेकडून विद्यमान विधान परिषदेचे सदस्य आमश्या पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली. तर भाजपाच्या माजी खासदार हिना गावित यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
राज्यातील पहिला क्रमांकाचे मतदार संघ असलेले अक्कलकुवा – अक्राणी मतदार संघातून माजी खासदार डॉ. हिना गावित अपक्ष उमेदवारी करीत आहेत. ही जागा शिंदेंची शिवसेनेच्या वाटेला गेली. मात्र नंदुरबार विधानसभा मतदारसंघात शिंदेंची शिवसेनेचे नेते मंडळी काँग्रेसच्या उमेदवाराचे प्रचाराला फिरत असून जाहीरपणे काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे आहेत .लोकसभेत शिंदे शिवसेनेचे नेत्यांनी जाहीर पणे काँग्रेस चा प्रचार केला. यामुळे अक्कलकुवा – अक्रानी मतदार संघाची शिंदेची शिवसेनेला सुटलेली जागा वरती मी अपक्ष उमेदवारी करीत आहे.तसेच भाजपाच्या कार्यकर्ता आणि पदाधिकारी हे अक्कलकुवा अक्रानी मतदार संघात शिंदे यांची शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचाराला जाणार नाही अशी भूमिका आम्ही घेतली आहे. आमच्यात गद्दारी नसल्यामुळे आम्ही तिथे काँग्रेस चा प्रचार करणार नाही मात्र अपक्ष उमेदवारी करणार आणि जिंकणार असा विश्वास माजी खासदार डॉ हिना गावित यांनी व्यक्त केला आहे.