भीषण अपघात, भरधाव बोलेरोने रस्त्यावर उभे असलेल्या पाच जणांना चिरडलं, थरकाप उडवणारी घटना,एकाच गावातील मृत व्यक्तीचा समावेश
नंदुरबार : नंदुरबार तालुक्यातील लोय पिंपळोद गावात 2 नोव्हेंबर रोजी रात्री ६ वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. ज्यात एका वेगवान बोलेरोने ३ मोटारसायकला चिरडले. यामध्ये ५ जणांचा मृत्यू आणि १ गंभीर जखमी झाला. दिवाळीच्या सणाला मृतांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार २ नोव्हेंबर रोजी रात्री सहा वाजेदरम्यान नंदुरबार ते धानोरा रस्त्यावर लोय पिंपळोद गावा पासून एक किमी अंतरावर एक मोटरसायकल नादुरुस्त झाली होती. अंधार असल्याने दुचाकी स्वाराच्या मदतीसाठी अजून दोन दुचाकी त्या ठिकाणी थांबल्या होत्या. त्यावेळी नंदुरबार कडून धानोरा कडे भरधाव वेगात जाणारी बोलेरो ( जी.जे.02, झेड.झेड.0877 ) यावरील चालकाने रस्त्याच्या कडेला असलेल्या उभ्या असलेल्या मोटरसायकलसह नागरिकांना चिरडले. या भीषण अपघातात योगेश कालूसिंग नाईक (४०) रा.पिंपळोद, ता.नंदुरबार, राहुल धर्मेंद्र वळवी (२६) रा.पिंपळोद, ता.नंदुरबार, अनिल सोन्या मोरे ( २४) रा.शिंदे,ता.नंदुरबार, चेतन सुनील नाईक (१२ ) रा.भवाली, ता.नंदुरबार, श्रीकृष्ण लालसिंग ठाकरे (४०) रा.पिंपळोद, ता.नंदुरबार यांचा मृत्यू झाला.
या अपघातानंतर तिघांच्या मोटरसायकलचा चक्काचुर झाला. पोलिसांनी घटनास्थळी येवुन बोलेरो गाडीची पाहणी केली असता गाडीत दारुच्या बाटली आढळुन आली तर बोलेरो गाडीही उलटली होती. गावकऱ्यांच्या मदतीने तिला सरळ करण्यात आली. या अपघातात एक जण गंभीर जखमी असून त्याला नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि गावकऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. एन दिवाळीत एकाच वेळी पाच जणांचा मृत्यू झाल्याने तालुक्यात शोककळा पसरली आहे. एकाच गावातील तीन मृत व्यक्तीचा समावेश अपघाच्या ठिकाणी पोलीस उपनगर पोलिस ठाणे पोलिस निरीक्षक अमितकुमार मनेळ व पोलिस कर्मचारी दाखल झाले होते. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती